… जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ खूपच विनोदी बोलतात, भातखळकरांचा टोमणा

Atul Bhatkhalkar & Chaggan Bhubal

मुंबई : राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भातखळकर यांनी टोमणा मारला – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अलीकडे खूपच विनोदी बोलतात!

राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इगतपुरीच काय, राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजर खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. त्यावरून टोमणा मारून भातखळकर यांनी भुजबळांना त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER