शिवसेनेला खिंडार पाडणाऱ्या दिग्गज नेत्याने केले एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादीत स्वागत

Eknath Khadse - Chhagan Bhujbal

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपाचा (BJP) राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच आपण राष्ट्रवादी (NCP) प्रवेश करत असल्याचं सांगत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. अशावेळी त्यांना नव्या राजकीय वाटचालीसाठी एकेकाळी शिवसेनेला हादरा देत अनेक आमदारांसह काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत. त्यांनी भाजप या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते. असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल,’ असा विश्वास देखील भुजबळ यांनी व्यक्त केला.

‘एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो,’ असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

दरम्यान भुजबळ यांनी शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत संघर्षानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसंच राज्याच्या राजकारणात नवा पक्ष उदयाला आल्यानंतर भुजबळ यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. याच भुजबळ यांनी आता भाजपला धक्का देणाऱ्या एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीत स्वागत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER