राज्यपाल चांगली व्यक्ती, ‘त्या’ नावांना विरोध करणार नाहीत : छगन भुजबळ

Governor Bhagat Singh Koshyari - Chhagan Bhujbal

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) हे चांगली व्यक्ती आहेत. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावांना विरोध करणार नाहीत, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लगावला आहे.

राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील असं वाटत नाही, असं सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER