उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश आनंदाची बाब : छगन भुजबळ

Chagaan Bhujbal & Urmila Matondkar

मुंबई :- राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ‘मातोश्री’वर अधिकृत पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधले . यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली . उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेना प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्या राजकारणात जनसेवेसाठी शिवसेनेत येत असतील, तर चांगलं आहे, असे भुजबळ म्हणाले .

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक एकत्र लढवत आहे. आम्हाला विश्वास आहे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. राज्यभरात विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे.

ही बातमी पण वाचा : भगवा मास्क, हाती शिवबंधन ;  उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER