शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणीतरी असेल

Chhagan Bhujbal

नाशिक :- पक्षांतराची नेत्यांची रांग अद्याप पूर्ण झालेली नाही. याच रांगेत अधूनमधून माजी कट्टर शिवसैनिकाच्या घरवापसी होण्याच्या वावड्या उठत असतात. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा याच पक्षांतराच्या रांगेत नंबर लावला जात असताना या चर्चेला  भुजबळ   यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेत प्रवेश करणारा छगन  भुजबळ   दुसरा कुणी तरी असेल, अशा शब्दांत  भुजबळ   यांनी माध्यमांना उत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : आता शिवसेनेचा ‘फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे’ नवा उपक्रम

मी सध्या येवल्यात आहे. माझ्या पक्षाचं काम करत आहे. शिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. आणि जर अशा सातत्याने वावड्या उठत असतील तर तो छगन भुजबळ दुसरा कुणी असेल, मी नाही, असं भुजबळ म्हणाले.

छगन  भुजबळ   यांनी  राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरू केली होती. मात्र, १९९१ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आघाडीच्या सत्तेत  भुजबळ   यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहे. परंतु  २०१४ नंतर आघाडीचं सरकार केंद्र आणि राज्यातून सत्तेबाहेर आलं. त्यानंतर आता सत्ताधारी भाजपत जाणा-या नेत्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यातच  भुजबळदेखील स्वगृही जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.  त्यावर  भुजबळ  यांनी हे उत्तर दिले आहे. शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणी तरी असेल, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूरला पुन्हा एकदा उभं करायचय : आदित्य ठाकरे