बाळासाहेब ठाकरेंनी विमानतळाला स्वत:चे नाव देण्यास नाकारले असते : छगन भुजबळ

Balasaheb Thackeray-Chhagan Bhujbal

नाशिक :- नवी मुंबई विनानतळाला (Navi Mumbai Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. या विमानतळाला शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यात आले आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे.

छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे विधान केले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी स्वतःचे नाव विमानतळाला दिले नसते. त्यांनी जे. आर. डी. टाटांचे नाव विमानतळाला सुचवले असते. नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नामकरणाच्या मुद्यावर थेट शिवसेनेला सुनावतानाच भुजबळांनी नरो किंवा कुंजरोवाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची आहेत.

वाघ पंजाही मारतो

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीवरही भाष्य केले. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राकडे आहेत. त्यामुळे मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वाघ पंजाही मारू शकतो, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

ही बातमी पण वाचा : नवी मुंबई विमानतळासाठी बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला, संजय राऊतांची स्पष्टोक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button