एकनाथ खडसेंबाबत शरद पवारच निर्णय घेतील! छगन भुजबळ

Chagan Bhujbal-Sharad Pawar

मुंबई :  जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहे . याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता खडसेंना कोणतं मंत्रिपद द्याययचं याचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच (Sharad Pawar) निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांचं स्वागतच आहे. आम्ही सर्व त्यांचं आनंदानं स्वागत करणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले. खडसेंना कोणतं मंत्रिपद देण्यात येणार आहे? त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात येणार आहे?, असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याबाबत पवारच निर्णय घेतील, असे भुजबळ म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER