वेळ आली तर नियम तीव्र करू : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

नाशिक : नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत (Corona virus) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कडक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. जर कोरोना आटोक्यात आला नाही, तर नियम तीव्र करू, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करू, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. शहरात कडक निर्बंधानंतरही कोरोना रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळाली आहे. शहरात ५२७ रुग्णसंख्या तर जिल्ह्यात ३९३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रात्रीची संचारबंदी तसेच शासनाने कडक निर्बंध लादल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. विविध रुग्णालयांत रुग्ण उपचार घेत आहेत तर काही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

त्याशिवाय लग्न सोहळा करणाऱ्यांनी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. गोरज मुहूर्तावरील लग्न टाळा, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. ज्या दुकानात सॅनिटायझर नसेल, तर दंड करा, अशा सूचना मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा जैसे थे सुरू राहणार आहेत. येत्या आठ दिवसांत शाळांबाबत निर्णय घेऊ, असेही भुजबळांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER