अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यास माझा विरोध नाही, भुजबळांचे स्पष्टीकरण

Chhagan-Bhujbal-and-Ajit-Pawar

औरंगाबाद :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न केले होते असे सांगत त्यांना उपमुख्यमंत्री करण्यास माझा विरोध नाही, आणि असण्याचे कारण नाही.

अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास विरोध असणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

‘मी उपमुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा’ – अजित पवार

पत्रकारांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदा संदर्भात प्रश्न विचारला असता, भुजबळ म्हणाले की, पक्षात कुणाला कुठले पद द्यायचे याचा विचार आमचे नेते शरद पवार करत आहेत. ते योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी सोपवतील. अजित पवार यांच्या बाबत देखील पवार साहेब योग्य निर्णय घेतील. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास माझा विरोध असण्याचे कारण नाही असा, पुनरुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला.