‘मुख्यमंत्रीपद हवे असल्यास आमच्यासोबत या’, छगन भुजबळांची शिवसेनेला खुली ऑफर

Chagan And Uddhav

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, पुढचा मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. निकालानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून घेणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या उद्धव यांनी भाजपाला इशारा दिला. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सरकार स्थापन करणार या प्रश्नावर राजकारणात काहीही होऊ शकते, भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.