६ ते ८ महिन्यांचा नको, १५ दिवसांचा लॉकडाऊन लावा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Chhagan Bhujbal

मुंबई :- महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध (Strict Restrictions) लावले आहेत. तरीही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. सोमवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी सांगितले की, दोन दिवसांत मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यासंबंधी निर्णय घेतील. दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. यावेळी लॉकडाऊनसंबंधी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली आहे. या बैठकीत १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

“आज ऑक्सिजन, रेमडेसिवीर पाहिजे तितके उपलब्ध नाहीत. विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणावा लागत आहे. जर १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन केल्यास इतर सगळ्या गोष्टी, साधनसामग्री एकत्र करण्यास वेळ मिळेल. तसेच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपयोग होईल. साखळी तोडणे आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणे या दोन मार्गांनी काम केले पाहिजे. लोक इतर कारणे देऊन फिरतातच आहेत. ८ ते १० दिवसांनी लोकांना काही अडचण होणार नाही. ६ ते ८ महिन्यांचा लॉकडाऊन नको. पण १५ दिवसांसाठी केले तर बरं होईल. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मुद्दा मांडणार आहे.” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button