विसरू नका निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचे तख्त बदलले होतं ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा योगींना इशारा

Chhagan Bhujbal - Yogi Adityanath

मुंबई : हाथरस (Hathras) प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)-प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. हाथरसची घटना मन विषण्ण करणारी आहे, असे भुजबळ म्हणाले.

काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निषेधार्ह असल्याचे देखील भुजबळ म्हणाले. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे. देशाच्या संसदेतील एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय हालत असेल, असे भुजबळ म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER