‘त्या’ लग्नानंतर छगन भुजबळांना कोरोना, सोबत असलेले शरद पवार क्वारंटाईन होणार ?

मुंबई :- राष्ट्रवादी काँगेसचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ रविवारी पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार क्वारंटाईन होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचे लग्न रविवारी (२१ फेब्रुवारीला ) नाशिकमध्ये झाले. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत भुजबळ उपस्थित होते. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारीही आले होते. त्यानंतर २४ तासात भुजबळ यांचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्याने शरद पवार (Sharad Pawar) क्वारंटाईन होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शरद पवार यांनी त्यांचे १ मार्चचे सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे.

ही बातमी पण वाचा : मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना ; राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER