कोरोना आढावा बैठकीत छगन भुजबळ आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी

नाशिक : नाशिकमध्ये वाढती कोरोना (Corona) रुग्णसंख्या आणि उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच वाढत्या रुग्णसंख्येबाबत लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेतली.

मात्र या बैठकीदरम्यान देवळा-चांदवड विधानसभेचे भाजप आमदार राहुल आहेर आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली. भाजप आमदार राहुल आहेर यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या गलथानपणाचा पाढाच वाचून दाखवला. नाशिक जिल्हा रुग्णलयात बेड वाढवले जात नाहीत, काही बेड रिकामे आहेत, तर कळवणच्या ग्रामीण रुग्णलयात सिटी स्कॅन मशीन धूळ खात पडून आहे. त्याचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर छगन भुजबळांनी सूचना करा म्हणून सुनावलं. यावेळी चांगलीच खडाजंगी झाली.

बैठकीत झालेल्या वादावर माध्यमांनी आमदार राहुल आहेर यांना विचारणा केली असता त्यांनी, ही आमची सर्वांचीच भूमिका असल्याचं सांगितलं. पालकमंत्री यांच्यासह सर्वांनाच वाटतं की परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी. मात्र काही अधिकारी दिशाभूल करत असल्याची शंका उपस्थित होते. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची परवड होते. लसीसंदर्भातही ग्रामीण भागात पुरेशी जागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक नागरिक लस घेण्यास उत्साहित असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य ती पावलं उचलली पाहिजे, असं राहुल आहेर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button