छगन भुजबळही पार्थ पवारांना म्हणाले, ‘नया हैं वह’

Chaggan Bhujbal-Parth pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोरच टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत झिडकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पार्थ पवारांना (Parth Pawar) ‘नया हैं वह’ अशी उपहासात्मक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी भुजबळ म्हणाले की, “शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया हैं वह.” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबात कोणीही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं.

“आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचेच एक सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावलं गेलेलं नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं, समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात, तेच पवारांनी केलं. ” असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवारसाहेब, पार्थपेक्षा लहान आदित्य ‘पद्म’ पुरस्कार समितीचे अध्यक्ष होण्याइतके मॅच्युअर कसे ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER