च्यवनप्राश रसायन – प्रत्येकाने नक्कीच घ्यावा

Chawanprash

आयुर्वेदात (Ayurveda) रसायन चिकित्सा वर्णित आहे. रसायन गुणांच्या औषधी सेवनाने मनुष्याला स्वास्थ्य दीर्घायु स्मरण शक्ति धारणाशक्ति वर्ण स्वर कान्ति स्वर यांची प्राप्ती होते. शरीरात बल ताकद व्याधीक्षमत्त्व चांगले राहण्याकरीता या रसायन औषधांचे सेवन केले जाते. अर्थात या औषधी सेवनाचे काही नियम आहेत. त्या पद्धतीनेच या औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे. च्यवनप्राश हे एक प्रमुख रसायनच आहे. च्यवनप्राश योग्य शास्त्रोक्त पद्धतीने बनविला असेल आणि योग्य पद्धतीने सेवन केला गेला तर त्यासारखे रसायन औषध नाही.

थंडीचे दिवस, कोविड संक्रमण झाल्यानंतर, व्याधीक्षमत्त्व वाढविण्याकरीता च्यवनप्राशचा सल्ला देण्यात येतोय. जाणून घेऊया च्यवनप्राश नक्की काय मदत करतो. च्यवनप्राश हा उत्तम ऋतुनुसार उपलब्ध आवळ्यांपासून बनविण्यात येतो. यात दशमूळ, पिंपळी गुळवेल इ. 30 च्या वर औषधी वापरण्यात येतात. तेल तूप मध यांचा वापर विविध स्तरावर होतो. यात काढा बनविणे आवळा उकळणे, गर काढून तूपावर भाजणे, औषधी मिसळणे अशी विविध क्रिया या दरम्यान केल्या जातात. त्यानंतर बनतो उत्तम रसायन गुणयुक्त च्यवनप्राश!

च्यवनप्राशचे गुण काय ?

कास श्वास (दमा) सूज, हृदरोग, शुक्ररोग वातदोष दूर करणारे आहे. बालक, वृद्ध, क्षय झालेले, कृश यांना सुडौल करणारा आहे. मेधा स्मृति कान्ति स्वर आरोग्य इंद्रिय शक्ति वाढविणारे आहे.

च्यवनप्राश कधी घ्यावा?

च्यवनप्राश सकाळीच घ्यावा. पोट साफ झाल्यावर भूक लागल्यावर च्यवनप्राश घ्यावा. नंतर सडकून भूक लागू द्यावी व जेवण करावे. खरंतर च्यवनप्राशसोबत दूधाची गरज नाही. च्यवनप्राश हा अवलेह वा चाटण आहे त्यामुळे तो तोंडात घोळून घोळून खाल्ला पाहिजे. लाळेसोबत तो पोटात जाणे अपेक्षित आहे.

च्यवनप्राश हा केवळ सर्दी खोकला दूर करणारे नसून सप्तधातूंना ताकद देणारे आहे इतका खोलवर परीणाम च्यवनप्राशसारख्या रसायनांचा होत असतो. म्हणून योग्य पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने नक्की घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER