पुजाराने केली ब्रॅडमन यांची बरोबरी

ब्रिस्बेन कसोटीच्या (Brisbane Test) दुसऱ्या डावात (सामन्यातील चौथा डाव) चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 211 चेंडूत 56 धावांची झुंझार खेळी केली आणि या खेळीदरम्यान त्याने असा विक्रम केला जो सर डॉन ब्रॅड मन यांनाच जमलेला आहे. त्याचे कसोटी सामन्याच्या चौथ्या डावातील हे चौथे अर्धशतक असून चारही अर्धशतके एकाच संघाविरुध्द (ऑस्ट्रेलियाविरुध्द) आहेत. याच्याआधी अशी कामगिरी सर डॉन ब्रॅड मन यांची होती ज्यांनी कसोटीच्या चौथ्या डावातील आपली पहिली चारही अर्धशतके एकाच संघाविरुध्द म्हणजे इंग्लंडविरुध्द केली होती.

पुजाराची चौथ्या डावातील अर्धशतके

56 – ब्रिस्बेन – 2021
77 – सिडनी – 2021
82 – दिल्ली – 2013
72 – बंगळुरु – 2010

ब्रॅडमन यांची चौथ्या डावातील अर्धशतके

58 – अॕडिलेड – 1929
131 – नाॕटींगहॕम – 1930
66 – अॕडिलेड – 1933
102 – लाॕर्डस- 1938

या मालिकेत पुजाराने चारही सामन्यात एकूण 928 चेंडू खेळून काढले. ऑस्ट्रेलियात चार किंवा कमी कसोटी सामन्यांच्या मालिकेत एखाद्या खेळाडूने केलेला हा पाचव्या क्रमांकाचा सार्वाधिक खेळ आहे. सर्वाधिक चेंडू खेळायच्या बाबतीत पुजाराच पहिल्या स्थानी आहे. त्याने 2018-19 च्या मालिकेत तब्बल 1258 चेंडू खेळून काढले होते.

पुजाराने गेल्या तीन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 21 डावात मिळून 993 धावा केल्या आहेत आणि प्रत्येक डावात त्याने सरासरी 127 चेंडूंचा खेळ केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER