निवड समिती अध्यक्षपदी चेतन शर्मा, सदस्यपदी अ‍ॅबी कुरुविला व देवशिश मोहांती

BCCI - Chetan Sharma

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समिती (BCCI Selection committee) अध्यक्षपदासाठी माजी कसोटीपटू जलद गोलंदाज चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अ‍ॅबी कुरुविला (Abey Kuruvilla) व देवशिष मोहांती (Debashish Mohanty) यांची सदस्यपदी वर्णी लागणार आहे. मदनलाल यांच्या अध्याक्षतेतील क्रिकेट सल्लागार समिती (CAC) समितीने राष्ट्रीय निवड समितीवर या तिघांची शिफारस केली आहे.

मदनलाल, आर.पी.सिंग व सुलक्षण नाईक यांच्या समितीने 11 सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. निवड समितीवर तीन जागा रिक्त होत्या. अधिक कसोटी सामने खेळलै असल्याने चेतन शर्मा यांची निवड समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जतीन परांजपे (पश्चिम झोन), शरणदीप सिंग (उत्तर विभाग) आणि देवांग गांधी (पूर्व विभाग)यांच्या जागा रिक्त होत्या. निवड समितीचे उर्वरीत दोन सदस्य सुनील जोशी व हरविंदर सिंग आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER