चेतन सकारियाची पितृसेवा निष्फळ, त्याच्या वडिलांचे कोरोनाने निधन

Chetan Sakariya with his father

आयपीएल (IPL) संपल्या संपल्या सौराष्ट्र व राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) चा जो क्रिकेटपटू पितृसेवेत व्यस्त झाला त्या चेतन सकारिया (Chetan Sakariya)चे वडिल कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे रविवारी भावनगर येथील एका दवाखान्यात निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

आयपीएल मध्येच संपल्याने घरी लवकर परतलेल्या चेतनने परतल्या परतल्या दवाखान्याच्या फेऱ्या सुरू केल्या होत्या आणि तो सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत वडील दाखल असलेल्या दवाखान्याबाहेरच थांबून असायचा. वडीलांना मधूमेह आणि त्यात कोरोना असल्याने तो अधिकच चिंतीत होता.

तो आयपीएलमध्ये व्यस्त असतानाच गेल्या आठवड्यात त्याचे वडील कोरोना पाॕझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. कांजीभाई हे रिक्षा (टेम्पो) चालवायचे.

चेतनवर अतिशय कमी वयात नियतीचा हा दुसरा आघात आहे. आयपीएलचा करार मिळण्याआधीच त्याला अतिशय प्रिय असलेला त्याचा लहान भाऊ देवाघरी गेला होता. आपल्या भावासाठी आपण काहीच करू शकलो नाही याचे दुःख त्याला आहेच, त्यात आता वडिलांना गमावल्याच्या दुःखाची भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button