चेन्नईचा ‘सुपर’ विजय, हैदराबादला २० धावांनी पराभूत केल

CSK

मंगळवारी दुबई येथे सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या.

चेन्नईकडून शेन वॉटसनने (Shane Watson) सर्वाधिक ३८ चेंडूत ४२ आणि अंबाती रायुडूने ३४ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. याशिवाय सलामीवीर सॅम कुररेनने २१ चेंडूत ३१, महेंद्रसिंग धोनीने १३ चेंडूत २१ आणि रवींद्र जडेजाने १० चेंडूत २५ धावा केल्या.

चेन्नईने आतापर्यंतच्या सात सामन्यांपैकी पाच सामने गमावले आहेत आणि आता ते विजयी पथावर परत येत आहेत. आठ संघांच्या टेबलमध्ये चेन्नई सहा गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सनरायझर्सची परिस्थितीही फारशी चांगली नाही. सनरायझर्स हैदराबादने सात पैकी तीन सामने जिंकले असून सहा गुणांसह टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER