मुंबई इंडियन्सला मागे टाकून चेन्नई सुपर किंग्सने केला हा खास विक्रम

Mumbai Indians - Chennai Super Kings

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने शानदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सहा गडी राखून पराभव केला. नितीश राणा (८७) याच्या डावामुळे केकेआरच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सीएसकेच्या संघाने ऋतुराज गायकवाड (७२) आणि रवींद्र जडेजा (३१) यांच्या डावामुळे सामना आपल्या नावे केला. या सामन्यात चेन्नई संघाने अखेरचा चेंडूवर सामना जिंकला आणि एका विशेष प्रकरणात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मागे सोडले.

वस्तुतः चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलमध्ये सहा वेळा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला आहे आणि त्यांनी या प्रकरणात मुंबई इंडियन्सच्या संघाला मागे टाकले आहे. मुंबई संघाने पाठलाग करताना अखेरच्या चेंडूवर पाच वेळा सामना जिंकला आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सचे नाव (४) तिसर्‍या क्रमांकावर आहे. मॅचच्या शेवटच्या बॉलवर रवींद्र जडेजाने केकेआरचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला षटकार ठोकत सीएसकेने हा सामना जिंकला. या हंगामातील १३ व्या सामन्यात सीएसकेचा हा पाचवा विजय आहे, तर केकेआरचा १३ व्या सामन्यात सातवा पराभव आहे.

आता संघाला प्लेऑफमध्ये पोहचणे फारच अवघड वाटत आहे. इयोन मॉर्गनची टीम या मोसमात फक्त एक सामना खेळणार असून सध्या केकेआरचे १२ गुण आहेत. संघाने शेवटचा सामना जिंकला तरी संघाकडे १४ गुण असतील. त्यामुळे केकेआरसाठी आता इतर संघांची कामगिरीही खूप महत्त्वाची आहे. केकेआर विरुद्ध सीएसकेच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स आयपीएल-२०२० च्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER