चेन्नई एक्सप्रेसने पूर्ण केली ७ वर्षे आणि दीपिका पादुकोणला आठवली ‘मीनाम्मा’

Depika Padukon & Sharukh Khan

या चित्रपटात दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) मीना (मीनाम्मा) ची भूमिका साकारली होती. दीपिकाचे बोलचाल आणि दक्षिण भारतीय स्वरातील अभिव्यक्तींनी लोकांना खूप प्रभावित केले. या चित्रपटातील दीपिकाच्या पात्राशिवाय तिचा ड्रेस आणि लुकसुद्धा चाहत्यांना वेड लावत होते.

दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान (Sharukh Khan) स्टारर ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने ७ वर्षे पूर्ण केली आहेत. ८ ऑगस्ट २०१३ रोजी रिलीज झालेल्या या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडक दिली. चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्यावर दीपिकाने तिची व्यक्तिरेखा मीनाम्माची आठवण करून देत इंस्टाग्राम स्टोरीवर फॅन पेजची फोटो शेअर केली आहेत.

चित्रपटात ती खरोखरच दक्षिण भारतीय सौंदर्यासारखी दिसत आहे. अभिनेत्रीने चित्रपटाची सात वर्षे पूर्ण केल्याच्या आनंदात काही फोटोही शेअर केले आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट ११५ कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि देश-विदेशात चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बजेटपेक्षा जवळपास ४२३ कोटींची कमाई केली. मार्च २०१८ च्या अहवालानुसार चेन्नई एक्सप्रेस हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ११ वा क्रमांकचा बॉलीवूड चित्रपट आहे. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन कॉमेडी प्लस रोमान्सच्या कथांमुळे लोकांचे खूप मनोरंजन झाले. शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीचेही कौतुक झाले. लुंगी डान्स, तीतली, चेन्नई एक्सप्रेस टायटल साँग या चित्रपटाची गाणीही खूप गाजली होती.

दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर अखेर ती छपक या चित्रपटात दिसली होती. दीपिकाच्या आगामी चित्रपटात ८३ या चित्रपटाचा समावेश आहे. यात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त दीपिका दिग्दर्शक शकुन बत्राच्या अनटाइटल्ड चित्रपटात काम करत आहे. यात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसुद्धा दीपिका सोबत असतील.

 

View this post on Instagram

 

Unforgettable!❤️ #7YearsOfChennaiExpress #Meenamma @itsrohitshetty @iamsrk @redchilliesent @utvfilms

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER