ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट्स ऑर्डर करताना ‘या’ गोष्टी तपासा…

beauty product

सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड सुरु आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला हे जास्त ऑनलाईन शॉपिंग करतांनी दिसतात. त्यात सर्वात जास्त ब्युटी प्रोडक्ट्स तसेच मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर करतात. शावेळी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. कारण ब्युटी प्रोडक्ट्स आणि मेकअप प्रोडक्ट्सचा वापर आपण आपल्या त्वचेवर करतो. चुकीचे प्रोडक्टचा वापर केल्यास अॅलर्जी अथवा इतर अन्य त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही ऑनलाईन मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर करणार असाल तर काही गोष्टी तपासून पहाणे गरजेचे असते…

  •  ब्युटी प्रोडक्ट्ससर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा कोणत्या टाईपची आहे, हे तपासून पहाणे गरजेचे असते. कोणत्याही प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट खरेदी करताना तुमची त्वचा ज्याप्रकारची आहे त्याला ते प्रोडक्ट सुट होईल का? त्यामुळे त्वचेला कोणती अॅलर्जी तर होणार नाही ना? या सर्व गोष्टी तपासून पहाव्यात.

  • वेगवेगळ्या साईटवर जाऊन प्रोडक्टच्या किमतींमध्ये तुलना करण्यापेक्षा एखाद्या विश्वासार्ह्य साईटवर जाऊन आपल्याला हव्या असलेल्या प्रोडक्टची ऑर्डर करावी. अनेक वेबसाईट असा आहेत की त्यांच्या ग्राहकांना त्या लॉयल्टीची ऑफरही देतात.

ही बातमी पण वाचा : डोळ्यांखालील सुरकुत्यांसाठी घरगुती उपाय

  • online productजर तुम्ही ऑनलाईन परफ्युम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा आवडता सुगंध लक्षात घेऊन ऑर्डर करा. बऱ्याचदा काही सुगंधांमुले आपल्याला अॅलर्जी होण्याची शक्याता असते त्यामुळे पहिल्यांदा नीट पडताळून मगच ऑर्डर करा. परफ्यूम लिमिटेड अॅडिशनमधील असेल तर त्याबाबत नीट माहिती तपासून मगच ऑर्डर करा.

  • कोणत्याही साइटवरून कोणतेही ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्याआधी ब्लॉगर्सचे रिव्यू वाचून घ्या. त्यामुळे तुम्हाला एखादे प्रोडक्ट खरेदी करताना मदत होईल.

  • बऱ्याचदा ऑनलाईन कंपनी आपल्या साइटच्या माध्यमातून थर्ड पार्टी सेलरला त्यांचे प्रोडक्ट विकण्याची परवानगी देते. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेल्या प्रोडक्टसोबतच ते तयार करणाऱ्या कंपनीबाबतही योग्य ती माहिती जाणून घ्या.