नपुंसक मुलासोबत लग्न लावून महिलेची केली फसवणूक

८ ते १० लाखाची केली फसवणूक

Cheating of a woman by marrying an impotent child

औरंगाबाद :- २५ वर्षीय तक्रारदार महिलेसोबत मुलगा नपुंसक असल्याचे माहित असतांना देखील त्याचे लग्न लावून देऊन ८ ते १० लाख रूपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. हा प्रकार १ मे २०१७ ते २३ सप्टेंबर २०१९ या काळात घडला. न्यायालयाने याप्रकरणी दिलेल्या आदेशानुसार नपुंसक पतीसह ८ जणाविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला जिन्सी परिसरातील रहिवासी असून तिचा विवाह शेख रियाज शेख रसूल (वय २८, रा.भोकरदन, जि.जालना) याच्यासोबत लावण्यात आला होता. लग्नानंतर पती नपुसंक असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी महिलेला तलाख देण्याची मागणी करत लग्नात झालेला खर्च देण्याची मागणी केली होती. परंतु महिलेच्या सासरकडील मंडळींनी तिची मागणी धुडकावून लावली होती असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अब्दुल पठाण करीत आहेत.