तामिळनाडूत मिळणार स्वस्त ‘मोदी इडली’

MODI IDLI

दिल्ली : दक्षिण भारतात इडली अतिशय लोकप्रिय आहे. तामिळनाडूतील सलेममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ‘मोदी इडली’ विकण्याची तयारी सुरू आहे. करोनाच्या साथीच्या काळात ही इडली केवळ १० रुपयात मिळणार आहे.

एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे की – मोदी इडली डिशची संकल्पना भाजपाचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष महेश यांची आहे. याच्या प्रचारासाठी शहराच्या निरनिराळ्या भागांमध्ये मोदी इडलीचे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि दुसऱ्या बाजूला महेश यांचे छायाचित्र आहे.

१० रुपयांना ४ इडली  मिळणार आहेत.  मॉडल किचनमध्ये या इडली तयार केल्या जातील, असेही त्यावर नमूद केले आहे. “मोदी इडली विक्रीसाठी २२ दुकाने सुरू करण्याची योजना आहे. या योजनेला यश मिळाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवली जाईल.” असे तामिळनाडू भाजपाचे माध्यम सचिव आर. बालासुब्रमण्यम यांनी सांगितले.

याआधी तामिळनाडूतील वेकटचलपुरम पंचायतचे अध्यक्ष एम. पलानीसामी (४८) यांनी लोकांना स्वस्त अन्न देण्यासाठी १ रुपयात इडली विकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER