चवळीची शेंग : ६ फूट लांब अन् दीड किलो वजन ! शेतात बघ्यांची गर्दी

Chawli pods

भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर येभील शेतकरी मुनेश्वर राऊतयांच्या शेतातल्या चवळीच्या शेंगांच्या वेलाला ६ फूट लांब आणि सुमारे दीड किलो वजनाच्या शेंगा लागल्या आहेत; शेंगेचा दाणा सहा – सात सेंटीमीटर जाड आहे! या प्रचंड शेंगा पाहण्यासाठी मुनेश्वर यांच्या शेतात लोकांची गर्दी असते. ग्रामीण भागातील या शेतकऱ्याने केलेला हा प्रयोगही अनेकांसाठी कुतुहलाचा आणि शेतकऱ्यांना नवीन काहीतरी मार्ग दाखविणारा आहे.

पारंपारिक वाणांच्या शेतीसोबतच राऊत यांनी घराशेजारी असलेल्या शेतात भाजीपाला म्हणून ‘ब्रिंजल’ जातीच्या चवळीचे उत्पादन घेण्याचे ठरवले. पावसाळ्याच्या प्रारंभी पंचवीस वेल लावलेत. दोन वेल मेले. इतर वेलींसाठी त्याने मांडव घातला. आज एका वेलाला नऊ ते दहा चवळीच्या शेंगा लागल्या आहेत.

एरवी चवळीची शेंग म्हणजे बारकी-कोवळी आणि आकाराने छोटी असते. ही शेंग पाच – सहा फूट लांब आहे. सहा-सात सेंटीमीटर जाड आहे आणि सुमारे एक ते दीड किलो वजनी आहे. शेंगाची चव कोवळ्या दोडक्यासारखी आहे, असे सांगतात. पहिल्यांदाच बाजारात आलेली ही शेंग सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER