छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनाच मी गुरू मानतो : खासदार संभाजीराजे

Chhatrapati Shivaji Maharaj - Gurupornima

मुंबई : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापल्या गुरूंचं स्मरण करून त्यांना वंदन करतो आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनाच मी गुरू मानतो, असे म्हटले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवर दोन फोटो पोस्ट करत त्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना वंदन करताना दिसून येत आहेत.

या दोन्ही राजांच्या जीवन आदर्शांना मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनाच मी गुरू मानतो! त्यांच्या जीवन आदर्शांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो. या साधनेत मी एक टक्का जरी यशस्वी झालो तरी माझे जीवन सार्थकी लागले असे मी मानेन.” असे ट्विट त्यांनी केले आहे .

दरम्यान भारतीय संस्कृतीत  गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आईवडिलांनंतर गुरूला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरूकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरूची पूजा करणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे हे महत्त्वाचे मानले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER