लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने दुसरे शतक लगावताच आयपीएलमध्ये केला नवा विक्रम

Ben Stokes

रविवारी राजस्थान रॉयल्सने (RR) जबरदस्त खेळात स्पर्धेतील बलाढ्य संघ मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. राजस्थानकडून मोठ्या प्रतीक्षेनंतर अष्टपैलू बेन स्टोक्सची (Ben Stokes) बॅट जोरदार बोलली. स्टोक्सने केवळ मोसमातील पहिले षटकार ठोकले नाहीत तर शतकी खेळीने राजस्थानला विजय मिळवून दिले. या दरम्यान स्टोक्सने एक नवीन विक्रमही केला.

खरं तर, बेन स्टोक्सने दुसऱ्यांदा लक्ष्याचा पाठलाग केला आणि असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सलामी फलंदाजी करताना स्टोक्सने अबूधाबीच्या मैदानात अवघ्या ६० चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी खेळली. या दरम्यान त्याने १४ चौकार आणि तीन षटकार लगावले. टी -२० करियर आणि आयपीएलमधील स्टोक्सची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी २०१७ मध्ये त्याने १०३ धावांची खेळी केली होती.

लक्ष्याचा पाठलाग करताना स्टोक्सने त्याच्या पहिल्या आयपीएल मोसमात असेच शतक झळकावले होते. २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या लीगच्या ३९ व्या सामन्यात स्टोक्सने ६३ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली आणि रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळत गुजरात लायन्सविरूद्ध सामना जिंकवला होता. त्यावेळी त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि सात चौकार व सहा षटकार ठोकले होते.

स्टोक्सच्या विजयी डावामुळे राजस्थान रॉयल्स संघ दहा गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. यासह, रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा देखील जिवंत झाली आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि आता उर्वरित दोन्ही सामने चांगल्या धावसंख्येसह जिंकण्याची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER