महिलेला छेडणाऱ्याला मारहाणप्रकरणी नितीन नांदगावकरांवर गुन्हा दाखल

Nitin Nandgaonkar

मुंबई : माटुंगा रेल्वेस्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी जबर मारहाण केली . या प्रकरणी नितीन नांदगावकर यांच्यावर अँन्टोप हील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार , माटुंगा रेल्वेस्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता; मात्र समोर येऊन कुणीही तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आले होते.

मात्र हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही तर हे असेच कृत्य करतील. यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर हे १५ दिवसांपासून शोध घेत होते.

नांदगावकर यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. चोप दिलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता.