बदल्यांवरून सरकारला योग्यवेळी अडचणीत आणणार, फडणवीस यांचा इशारा

Devendra Fadnavis - Mahavikas Aghadi

पुणे : कोरोनाच्या (Corona) संकटकाळातही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. बुधवारी रात्री आघाडी सरकारने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या बदल्यांबाबत मी योग्यवेळी बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याची तक्रार असल्याचे विचारल्याबद्दल फडणवीस म्हणाले की, या पोलिसांच्या बदल्यांबद्दल पोलिस महासंचालकांचा अहवाल प्रसिद्ध झाला तर त्यामध्ये कोणाकोणाचा हस्तक्षेप झाला आहे, याची माहिती समोर येईल. ती उघड झाली तर सरकारची अडचण होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल (Subodh Jaiswal) नियमानुसारबदल्या करण्यावर ठाम होते, वेळ पडल्यास सुट्टीवर जाईल पण नियमानुसार बदल्या केल्या जातील असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर फडणवीस यांनी बोट ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल्यांवरून बरीच खदखद असल्याची चर्चा होती. त्यातही गृह विभागाकडील बदल्यांकडे अनेकांचे लक्ष होते. राज्य सरकारने ४५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यावरून काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांत मतभेद असल्याचे सांगण्यात येत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER