औरंगाबाद : शिवजयंती निमित्त वाहतूकीत बदल

Aurangabad - Shiv Jayanti

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण असलेल्या क्रांती चौक, संस्थान गणपती मार्गावर निघणाऱ्या मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. जुन्या शहरात मिरवणूक निघणाऱ्या मार्गांची आठ विभागांमध्ये विभागणी केली आहे. एका विभागात स्वतंत्र निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २० कर्मचारी व २ महिला कर्मचारी असतील. बुधवारी मिरवणुकांसह ठिकठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी उसळणार असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असेल, असे सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले.

सकाळी ११ वाजेपासून रात्री बारापर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. आवश्यकतेनुसार बदल केले जातील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त दिनेश कोल्हे यांनी केले.

१. एन-१२ नर्सरी सिडको, टीव्ही सेंटर चौक, जिजामाता चौक, एम-२, एन-९, शिवनेरी कॉलनी, पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, ओंकार चौक, बजरंग चौक, आविष्कार चौक, शिवाजी महाराज पुतळा ते चिश्तिया कॉलनी चौक.

२. राजाबाजार चौक, संस्थान गणपती, शहागंज-गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया-पैठणगेट, सिल्लेखाना चौक, क्रांती चौक ते भडकल गेटपर्यंत.

३. जयभवानीनगर चौक ते गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपूल ते जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील चौक.