कोविडनंतर दिनचर्येत बदल आवश्यक !

कोविड संक्रमणाचे प्रमाण वाढलेले तर आहेच पण बऱ्याच जणांना पुन्हा कोविड झाल्याचेही समोर येत आहे. एखादा रोग झाल्यानंतर त्याच्याशी लढणाऱ्या ॲण्टीबॉडिज तयार होतात व रोगाविरुद्ध शरीराची प्रतिकार क्षमता तयार करतात. कोविडमधे मात्र पुन्हा संक्रमण झाल्याची अनेक उदाहरणं दिसत आहेत. कोरोनाच्या (Corona) आजारपणानंतर अशक्तपणा खूप जास्त जाणवतो. जिभेची चव जाणे किंवा अन्न घेण्याची इच्छा न होणे, अनेक औषधी घेतल्याने ॲसिडीटी होऊ शकते. त्यात ज्यांना मधुमेह बिपी इ. शारीरीक व्याधी असल्यास अधिक त्रास जाणवतो. या सर्व गोष्टीचा विचार करून दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

दंतधावन (ब्रश) बदलणे. पूर्वीच्या काळी किंवा आताही बऱ्याच गावांमधे लोकं कडुलिंबाची करंजाची काडी दंतधावन म्हणून वापरतात. ती रोजच्या रोज नवीन घेतल्याने संक्रमणाचा संभव मुळीच नसतो. टुथब्रश मात्र रोज तोच वापरण्यात येतो. म्हणूनच पुनः संक्रमण टाळण्याकरीता टुथब्रश नक्कीच बदलावा. याशिवाय त्रिफळा हरीद्रासारख्या द्रव्यांनी गुळण्या कराव्या.

नस्य – नाकात अणु तेल टाकणे.

प्राणायाम ओंकार उच्चारण – कोविड पश्चात प्राणवह, रक्तवहस्रोतस तसेच मानसिक स्वास्थ्याकरीता सर्वात उत्तम पर्याय प्राणायाम श्वास प्रश्वास व्यायाम, ओंकार उच्चारण आहे. यावर अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहेच.

आहारातील पथ्य – कोणताही आजार असो अन्नवह स्रोतसावर त्याचा परीणाम होतच असतो. अशक्तपणा आलेला असला तरी सर्वकाही खाण्यास सुटणे हा पर्याय नाही. चुल पेटवितांना देखील हळूहळू एक एक काडी घालून अग्नि तयार होतो मग हे तर शरीर आहे. जाठराग्नि पूर्ववत होण्याकरीता व ताकद येण्याकरीता योग्य आहाराची खूप गरज आहे.

यात मुख्यतः बेकरीचे पदार्थ अति तिखट मसालेदार बेसनाचे पदार्थ टाळावे. मुगाची डाळ कुळीथ ज्वारी भाकरी फळभाजी योग्य प्रमाणात तुपाचा वापर करावा. जेवण हलके सुपाच्य पण पौष्टीक असावे. फोडणी देतांना खडा हिंग जीरे धणे आलं कढीपत्ता याचा वापर करावा. टमाट्याऐवजी आमसूलाचा वापर करावा. मांसाहारी व्यक्तींनी मांसरस (सूप) घ्यावे.

अति परिश्रम टाळावे. मन प्रसन्न ठेवावे.

आयुर्वेदात (Ayurveda) अपुनर्भव चिकित्सा म्हणजेच आजार पुन्हा होऊ नये याकरीता रसायन चिकित्सा सांगितली आहे. च्यवनप्राश हे एक उत्तम रसायन आहे जे शरीरातील झीज भरून काढते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चा रसायनांचा नक्कीच समावेश करावा. कोविडमधून बरा झाल्यानंतर पूवर्वत होण्याकरीता काळजी महत्त्वाची ठरते.

ही बातमी पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button