‘आघाडीत पुन्हा बिघाडी’, अशोक चव्हाण यांचं खळबळजनक विधान

Ashok Chavan

परभणी :- काँग्रेसच्या (Congress) महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं म्हणत त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढण्याची चिन्ह आहे.

दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. अशोक चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनसोबत महाआघाडी करण्यासंबंधी खुलासा करत दिल्लीतील नेते नाराज होते असं सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबद्दल दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे राज्यात भाजपाकडून (BJP) काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेल हे मी स्वतः जाऊन दिल्लीतील नेत्यांना पटवून दिलं. यानंतरच आपण महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामील झालो,असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

ही बातमी पण वाचा :  चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय ; अशोक चव्हाणांचा टोला  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER