चांद्रयान मोहिम अयशस्वी होणे दुःखदायक, मात्र इस्त्रोप्रमुखाने भावविवश होणे भितीदायक

Vishwambhar-Chaudhary

बंगळुरू : चांद्रयान-2 मोही यशस्वी न झाल्याने इस्त्रोचे प्रमुखे के. सिवन यांनी भावनाविवश होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारत धीर दिल्याचा प्रसंग सर्व देशवासियांनी बघितला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हेसुद्धा होते. ते म्हणाले, एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास मिठी मारून रडणे नक्कीच शोभत नाही. इस्त्रोप्रमुख भावविवश झाली बातमीच भितीदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फेसबुकवर चौधरी यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “नासाच्याही अनेक मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत पण नासाप्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफिती पाहण्यात नाहीत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते”.

ही बातमी पण वाचा : ‘इस्रो’ प्रमुखांना मिठी मारत मोदींनी दिला धीर 

इस्रो ही वैज्ञानिक संस्था आहे, राजकीय पक्ष नाही. चांद्रयान हे एक जटिल वैज्ञानिक यंत्र आहे. फार मोठ्या शास्त्रज्ञांनी इस्रो सांभाळली आहे, अनेक अपयशं पचवली आहेत. मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणे हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.