तांत्रिक बिगाडीच्या कारणास्तव #ISRO ने थांबवली चंद्रयान-२ ची लॉन्चिंग

इस्रोने सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चंद्रयान-२ ची लॉन्चिंग तांत्रिक बिगाडीच्या कारणास्तव स्थगित केली आहे. लॉन्चिंगच्या 56 मिनिटं आणि 24 सेकंदच्या आधी चंद्रयान-2 ची काउंटडाउन थांबवण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण जगभर ISRO च्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून सुरू होते. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चंद्रयानाचं उड्डाण होणार होतं. चंद्रयान-2 साठी इस्रोची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र क्रायोजिनिक इंजनच्या यंत्रणेत काही दोष आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. इस्रो लवकरच नवी तारीख जाहीर करणार आहे. इस्रोनं पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे.