चंद्रयान २ : ७ सप्टेंबरला या वेळी होणार चंद्रावर लॅंडींग

chandrayaan-2

वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल


बंगळुरू : इस्रोचे चंद्रयान – 2 आज चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेनंतर इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी माध्यमांशी संवाद साधला. इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 2 सप्टेंबरला लँडर विक्रम चांद्रयानापासून वेगळा होणार आहे. के सिवान यांनी चंद्रावर लॅंड होण्याची निश्चित वेळ सांगीतली आहे. लॅंडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली.

सिवान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चांद्रयान 2 चा महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होऊन, त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊ. लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणार असल्याचे सिवान यांनी सांगितले.

तसेच सिवान यांनी लॅंडर विक्रम यांची चंद्रावर उतरण्याची वेळदेखील जाहीर केली आहे. 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी लँडर विक्रम हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर उतरेल. असे त्यांनी सांगितले.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जाणार आहेत. चंद्राच्या भूमीवर उतरण्याच्या 4 दिवसाआधी रोव्हर ‘विक्रम’ त्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. पाहणी झाल्यानंतर लँडर यानापासून वेगळा होईल. विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग करून 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. हा दरवाजा उघडल्यानंतर रोव्हरला बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल. अशी महत्त्वपूर्ण माहिती सिवान यांनी माध्यमांना दिली.

भारताची ही दुसरी चंद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील अनभिज्ञ गोष्टी शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.