उद्धव ठाकरेंना प्रशासकीय विषय कळत नाहीत, ते केवळ वेळ मारुन नेतात: भाजप नेत्याची टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला . मुख्यमंत्र्यांना प्रशासनातील फारशा गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे ते केवळ वेळ मारून नेण्याचे काम करतात, अशी टीका भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना बऱ्याच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मग मुख्यमंत्री वेळ मागून घेतात, मग अधिकारी सांगतील त्याप्रमाणे वागतात. उद्धव ठाकरे हे सक्षम मुख्यमंत्री असते तर त्यांनी राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा (MPSC Exam) 14 मार्चलाच घेतली असती, असे बावनकुळे यांनी म्हटले.

सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. अधिकाऱ्याने परीक्षा पुढे ढकलण्याचे पत्र काढले तेव्हा सरकार झोपले होते का? हा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे मोघलांचं सरकार आहे. पूर्वीच्या काळी औरंगजेबाची स्वारी आली की लोकांमध्ये भीती निर्माण व्हायची. तशीच भीती आता नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER