चंद्रशेखर ‘तिवारी’ असे बनले असामान्य चंद्रशेखर ‘आझाद’!

Chandrasekhar 'Tiwari' became an unusual Chandrasekhar 'Azad'!

मध्यप्रदेशच्या भाबरा प्रांतात २२ जूलै १९०६ ला सिताराम तिवारी आणि जागरानी देवी यांच्या पोटी एका सामान्य कुटुंबात बालकाचा जन्म झाला, नाव चंद्रशेखर (Chandrasekhar). पण त्यांच्या आयुष्यात अशा घटनांची असामान्य मालिका घडली ज्यामुळं चंद्रशेखर… चंद्रशेखर ‘आझाद’ नावानं ओळखले जावू लागले.

जालियनवाला बाग

जालियनावाल बाग हत्याकांडानंतर जहाल क्रांतीकाऱ्यांचा गट एकवटायला सुरुवात झाली. मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनकाऱ्यांची धरपकड करायला इंग्रजांनी सुरुवात केली. चंद्रशेखरांना अटक झाली. त्यावेळी त्यांच वय होतं फक्त १६ वर्षे.

कोर्टात त्यांची पेशी झाली. न्यायाधीशांनी नावं, वडीलांच नावं आणि पत्ता विचारला तर समोरून उत्तर आलं, “माझं नाव आझाद आहे, वडीलांच नाव स्वतंत्र आणि पत्ता तुरुंग.” त्यांच्या या उत्तरामुळं न्यायाधिश हैराण झाले. त्यांनी चंद्रशेखरांना १५ दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तुरुंगात चंद्रशेखरांना इंग्रजी पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली. चंद्रशेखरांनी हा त्रास, मारहाण सहन केली. ते तुरुंगातून बाहेर आले ते स्वातंत्र्याची अधिक तीव्र भावना मनात ठेवून. ते बनले ‘चंद्रशेखर आझाद’…

भगतसिंगांशी भेट

आझादांच्या क्रांतीकारी जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता कोकरी कांड. त्यांच्या नेतृत्वाखाली १० क्रांतीकाऱ्यांनी कोकरीमध्ये ती ट्रेन लुटली ज्यातून पैसा जात होता. इंग्रजी शिपायांच्या डोक्याला बंदूक लावून सर्व पैसा ट्रेनमधून उतरवण्यात आला. आझादांनी केलेली लुट इंग्रजांच्या जिव्हारी लागली. मोठा आर्थिक फटका तर बसलाच पण दहा क्रांतीकारांनी ही लुट घडवून आणल्यामुळं इंग्रजी पोलिसांना शर्मेनं मान खाली घालावी लागली.

इंग्रजांनी याचा बदला घ्यायचं ठरवलं शोधून शोधून एक एकाला ठार करण्याची कारवाई त्यांनी हातात घेतली पाच जण मारले गेले. आझाद वेशांतरात पटाईत होते. त्यांनी साधूचं रुप घेतलं अनवाणी पायांनी कानपूर गाठलं. तिथून त्यांनी नव्या क्रांतीकारी योजनांची आखणी सुरु केली आणि इथं त्यांची भेट झाली भगतसिंग यांच्याशी.

आझादांवर ठेवलेल्या इमानाचे मित्राला मिळावेत पैसे म्हणून अटक करुन घेतली

एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातांनी मिशांना देत असलेल्या तावाचा फोटो आझाद यांचे मित्र रुद्र नारायण यांनी बनवला होता. आझादांवर इंग्रजांनी मोठी रक्कम ठेवली होती. रुद्र नारायण यांनी आझादांचे चित्र बनवले होते. इंग्रजांना आझादांना शोधण्यासाठी त्यांच्या चित्राची गरज होती. रुद्र नारायण यांनी काढलेले चित्र आझादांचे आहे, हे सिद्ध झालं असतं तर त्यांना इनामाची मोठी रक्कम मिळणार होती.

रुद्रनारायणच्या घरची परिस्थीती जेमतेम होती. मित्राला चांगले पैसे मिळतील. त्याचे घर सुखाने जगेल म्हणून आझादांनी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मित्रासाठी त्यांनी हा भला मोठा त्याग केला.

क्रांतीकार्य आणि घरची जबादारी

आझादांनी स्वतःला क्रांतीकार्यात झोकून दिलं. दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थीती अत्यंत हालाखीची बनली होती. त्यांच्याकडे लुटीचा आणि काही ठिकाणाहून वर्गणीचा पैसा यायचा. त्यातील लहान सहान हिस्सा आझादांच्या घरी पाठवावा, अशी त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती.

हे ऐकून आझाद भडकले. म्हणाले, “इथं माझ्या एकट्याच्याच घरची परिस्थीती दैनीय नाही. इतरांची परिस्थीती ही वाईट आहे. तुम्हाला जर त्यांची सेवाच करायची आहे तर ही घ्या पिस्तोल. त्यांना गोळ्या घाला. त्यांची सेवा होवू जाईल.”

बलिदान

सँडर्सच्या हत्येनंतर इंग्रजांना कोणत्याही परिस्थीतीत आझादांना पकडायचं होतं. त्यांनी आझादांना पकडण्यासाठी आकाश पाताळ एक केलं पण हाती लागतील ते आझाद कसले? ते निसटण्यात माहीर. पण शेवटी इंग्रजांचा डाव यशस्वी होणार होता.

२७ फेब्रुवारी १९३१ला आजच्या प्रयागराजच्या अल्फ्रेड पार्कमध्ये आझाद इतर क्रांतीकारी साथीदारांची बैठकीसाठी वाट पाहत होते. बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत एका सहकाऱ्याशी आझादांचा वाद झाला. तो तिथून तडक निघाला आणि इंग्रजांना गाठून आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये लपल्याची त्यानं खबर दिली.

इंग्रज अक्खी तुकडी घेऊन पार्कमध्ये पोहचले. अंधाधूंद गोळीबार सुरु केला. आझादांकडे मोजक्याच गोळ्या होत्या. त्यांनी चिकाटीनं प्रतिकार केला पण पोलिसांच्या फौजेपुढं टिकाव लागणार नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली.

शेवटी उरलेली एक गोळी त्यांनी स्वतःवर झाडली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात जायचं नव्हतं. त्यांचं नाव आझाद होतं. आझाद म्हणूनच राहिले आणि मरणाला मिठीही आझाद म्हणूनच मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER