चंद्रपूर – आता आंदोलनातही कोरोनाची काळजी

Chandrapur

चंद्रपूर : गेल्या बारा दिवसांपासून चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ५०० कंत्राटी कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आंदोलनाला खंड पडू नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. हे सर्व आंदोलक मास्क बांधून आणि शारीरिक अंतर ठेवून आंदोलन करणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाशी लढताना, ‘ मी जबाबदार’ हा मंत्र दिला. त्याचे पालन आता हे आंदोलक करणार. एका शिस्तीत हे सर्व आंदोलक मंचावर उपस्थित होते. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा आहे, कोरोना काळात या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे वेतन आरोग्य विभागाने थकवले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. म्हणून संतापलेल्या ५०० कामगारांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे या सर्व कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ असे सन्मानित करायचे आणि दुसरीकडे त्यांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी वणवण हिंडायला लावायचे, असा प्रकार चंद्रपुरात पाहायला मिळाला आहे. या आंदोलनाला चंद्रपूरच्या विविध सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER