गांजा प्रकरण : कळंबा कारागृह बदलीचा उपचार

कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये (Kalamba) १० मोबाईल पाऊण किलो गांजा, चार्जर, दोन पेन ड्राईव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशीसाठी अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामनंद आज कोल्हापुरात दाखल झाले.

कळंबा कारागृहचे नवे पोलीस अधीक्षकपदी चंद्रमणी इंदुरकर (Chandramani Indurkar) नियुक्ती करण्यात आली आहे. इंदुरकर यांनी आज सकाळीच कळंबा कारागृहाची सूत्रे हाती घेतली आहेत. चौकशी संपेपर्यंत कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी करून तातडीने पुणे येथील येरवडा कारागृहमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता आलिशान मोटारीतून आलेल्या संशयितांनी कापडात गुंडाळलेल्या तीन पुडक्यांतून कैद्यांना मोबाईलसह गांजा व अन्य साहित्य भिंतीपलीकडून आत फेकून पुरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER