चंद्रकांतदादांची मागणी अजितदादांकडून मान्य, आमदार फंडातील निधी कोरोनासाठी वापरणार

Chandrakant Patil - Ajit Pawar

पुणे : आमदार निधीत कपात करुन तो निधी कोरोना (Corona) उपाययोजनांवर खर्च करण्यात यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे केली होती. आता त्यांची या मागणीची दखल घेत आमदार निधीतून ३५० कोटी आपण महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आमदार निधी खर्च करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ४ कोटींपैकी १ कोटी कोरोनावर खर्च करण्याची आमदारांना परवानगी दिली आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गडद झाले आहे. पुढच्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत सविस्तर चर्चा झाली. रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींसोबत मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबाबत चर्चा केली, व्हेंटिलेटरसंदर्भात प्रकाश जावेडकर यांच्याशी चर्चा केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. सोमवारी विभागीय आयुक्तांना ससूनच्या डॉक्टरासंदर्भात बैठक घेण्याची सूचना दिली आहे. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. संपूर्ण जग संकटात सापडले आहे. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. सरकार म्हणून काम करणारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये राजकारण न आणता कोरोनाबाधितांचा जीव जाणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीसंदर्भात परवानगी दिलेली आहे. सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर देण्याची गरज नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button