चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी आणि चॉकलेटसाठी भाजपात आलात; खडसेंचे उत्तर

Eknath Khadse And Chandrakant Patil

मुंबई :- भाजपा (BJP) सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना लगेच मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि खडसेंना टोमणा मारला होता – राष्ट्रवादी नाथाभाऊंचे समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी ! त्याला खडसेंनी उत्तर दिले, चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावे म्हणून भाजपामध्ये आलात!

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांच्या टोमण्याला उत्तर खडेसे यांनी पाटलांना सुनावले, भाजपाने मला काहीही फुकट दिले नाही. त्यासाठी मी भाजपाला चाळीस वर्षे दिली आहेत. मी जे काही मिळवले ते मनगटाच्या जोरावर. चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी संबंध तरी काय होता? चंद्रकांतदादा, तुम्ही विद्यार्थी परिषदेत होतात. काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावे म्हणून तुम्ही भाजपात आलात. तुम्हाला सगळ फुकट मिळाले. कोल्हापुरात आमदार आणि खासदार सोडाच, साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येईल का?

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादी नाथाभाऊंचे समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी – चंद्रकांत पाटील यांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER