चंद्रकांतदादा यांना हिमालयातच जावे लागणार : हसन मुश्रीफ़

Hasan Mushrif.jpg

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील द्वेषातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नसून पक्ष चालवण्यासाठी आहे, अशी टीका करत आहेत. काहीही झाले तरी चंद्रकांत पाटील ऊठसूट हिमालयात जाण्याची भाषा करतात. म्हणूनच चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नसून हिमालयात जाण्यासाठीच आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

आदमापूर येथे संत बाळूमामा सांस्कृतिक सभागृहात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या राधानगरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, विजय देवणे, ए. वाय. पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांच्या कोणत्याच समस्या सोडविल्या नाहीत. पदवीधरांचा अपमान करण्याचे काम त्यांनी केले आहे. यावेळची ही निवडणूक महाआघाडीच्या प्रतिष्ठेची बनली असल्याने कार्यकर्त्यांनी मतदारांच्या दारी जाऊन त्यांच्याकडून मतदान करुन घेणे गरजेचे आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील अरुण लाड व जयंत आसगांवकर हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER