चंद्रकांतदादांनी शब्द पाळला नाही; भाजपचा कोल्हापुरातला नेता कॉंग्रेस तर, पुण्यातला नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!

Gopalrao Patil - Chandrakant Patil

कोल्हापूर : 2019च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये (BJP) मोठी इनकमिंग झाली होती. कॉंग्रेस – राष्ट्रवादी सत्तेच्या कोसो दूर दिसत असल्याचे पाहून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नंतर गेमच पलटला आणि शिवसेना (Shiv Sena) कॉंग्रेस (Congress) राष्ट्रवादीने (NCP) भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मग पक्ष कोणताही असो नेत्यांना सत्ता महत्त्वाची वाटते. त्यामुळे आता भाजपमधील नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यामुळे भाजपमध्येही आता गळतीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे. भाजपचे मोठे नेते जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत.

त्यातच आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी पक्षप्रवेशावेळी दिलेला शब्द पाळला नाही असे सांगत कोल्हापुरातला नेता कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे तर, पुण्यातला नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले गोपाळराव पाटील (Gopalrao Patil) भाजपला सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द न पाळल्याचा गोपाळरावांनी आरोप केला आहे. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची असल्याची वर्तविली जात आहे.

कोण आहेक गोपाळराव पाटील –

गोपाळराव पाटलांचे चंदगड येथे मोठे राजकीय प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना तिकीट देण्यात येईल असे, असे भाजपने आश्वसान दिल्याचा दावा गोपाळराव यांनी केला. मात्र, ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलण्यात आल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून म्हटलं जात आहे. तसेच, भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. या सर्व कारणांमुळे गोपाळराव पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तर, दुसरीकडे पुण्यात बापू पठारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पुण्यात एकीकडे भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे हेसुद्धा (Bapu Pathare) राष्ट्रवादीत प्रवेश करुन घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याशी पठारे यांनी पक्षप्रवेशाबाबत खलबतं केल्याचं सांगण्यात येत होतं.

मात्र, पठारे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी अजित पवार यांनी भेटलेलो नाही. माझी आणि त्यांची कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या विरोधी लोकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात असल्याचं स्पष्टीकरण बापू पठारे यांनी 23 जानेवारी रोजी दिलं होतं.

दरम्यान, गोपाळराव पाटील, बापू पठारे अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेआधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER