ट्रक मेकॅनिकल बनणार परिवहन सभापती

Chandrakant Suryavanshi.jpg

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन समिती (Municipal Transport Committee) सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे परिवहन समिती सदस्य चंद्रकांत सुर्यवंशी (Chandrakant Suryavanshi) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सभापतिपदाची निवड २८ ऑक्टोबरला होणार आहे.

सभापतिपदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चंद्रकांत सुर्यवंशी हे ट्रक मेकॅनिकल आहेत. त्यांच्या मित्र परिवारात ‘चंदू मेस्त्री’म्हणून परिचित आहेत. त्यांची सभापतिपदी निवड होणार हे निश्चित असल्याने मित्र परिवारातून ‘कार्यकर्त्यांचा सन्मान, कोल्हापूरचा अभिनान. केएमटीच्या चाकांना गती देणाऱ्या मेकॅनिकल चंदू मेस्त्रींना मिळत आहे.

के. एम. टी. च्या चाकांना गती देणारे मेकॅनिकल चंदू मेस्त्रीना परिवहन समितीच्या (के.एम.टी.) सभापतीपदाचा सन्मान मिळतोय. साधारण २००३ चे साल असावे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या के.एम.टी. विभागाची परिस्थिती अतिशय बिकट होती. यावेळी सुनिल मोदी हे या परिवहन समितीचे सभापती होते. त्यांनी पूर्ण व्यापारी धोरण अवलंबून ‘केएमटी’ला उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. नविन बस खरेदी करण्यासाठी निधी नव्हता.

वर्कशॉपमध्ये सुमारे ५० हून अधिक बसगाडया बंद अवस्थेत होत्या. अशावेळी सभापती सुनिल मोदीनी कार्यकर्ते असणाऱ्या ट्रक मेकॅनिकल चंद्रकांत सुर्यवंशीची (चंदू मेस्त्री) मदत घेतली.

बंद असलेल्या बसमधून स्वत: चंदू मेस्त्रींनी महापालिका वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हातात हत्यारे घेऊन बंद म्हणजे स्क्रॅप करायच्या बसगाडया रिपेअरी केल्या. रस्त्यावर आणून प्रवाशी वहातुकीला चालू केल्या आणि केएमटी प्रशासनाला उर्जित अवस्थेत आणण्याच्या कामात मोलाची मदत केली. आजही ते आपल्या स्कूटरवरुन रस्त्याने जात असतील आणि रस्त्यावर धावणाऱ्या केएमटी बसमध्ये काही बिघाड दिसत असेल तर ते बस थांबवून सांगतात, ‘आरे जॉईंटची नट लूज झालेत गाडीत पाना असेल तर ड्रायव्हरला ती नट टाईट करुन द्यायला स्वत: मदत करतात. बसच्या आवाजामध्ये फरक दिसल्यास ड्रायव्हरला सांगतात अरे रेडीएटरमध्ये पाणी कमी आहे अगोदर पाणी घाल एखाद्या बसमध्ये गियर टाकताना आवाज आला तर रस्त्यातच थांबवून सांगतात आरे तुला कोणी लायसन दिलय पूर्ण क्लच दाबून गियर टाकायचा असतो, गियर मोडतोस काय आधीच के.एम.टी. अडचणीत आहे’ असे समजावणारा हा जेष्ठ अनुभवी ट्रक मेकॅनिकल आजही पांजरपोळ औद्योगिक वसाहतीत मुलाच्या सोबतीन ट्रक रिपेअरीचा व्यवसाय करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER