चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी ; थेट अजित पवारांनी घेतली दखल

Ajit Pawar - Chandrakant Patil

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावामध्ये भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) एकत्र आले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत कोल्हापुरातील खानापूर गावातील नव्या राजकीय समीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोध केला. ते पिंपरी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

खानापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेची (Shiv Sena) साथ सोडली हे चुकीचं असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत तेथील स्थानिकांना वरिष्ठांनी सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोल्हापुरातील खानापूर गावात आघाडीत बिघाडी झाल्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. हे गाव खुद्द चंद्रकांत पाटलांचे असल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आघाडीची राज्यात चर्चा होऊ लागल्यामुळे थेट वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या खानापुरातील निवडणुकीची दखल घ्यावी लागली आहे. या निवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, येथे झालेली आघाडी ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही तेथील लोकांना वरिष्ठांकडून सूचना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे झाले त्याचे समर्थन कुणीही करणार नही असेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER