चंद्रकांत पाटलांची वेळ चुकली : पालकमंत्री सतेज पाटील

Chandrakant Patil-Satej Patil

कोल्हापूर :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून निवडणूक लढविण्याबाबत २०१९मध्येच निर्णय घेणे अपेक्षित होते. आता निवडणूकीबाबत भाष्य करण्यात काही अर्थ नाही. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे राजीनामा देवून आ. पाटील यांच्यासाठी जागा रिकामी करण्याचाही विषय नाही. निवडणुकीबाबत भाष्य करण्याची चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची वेळ चुकीची असल्याचे मत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंगळवारी व्यक्त केले.

उच्च शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत (Uday Samat) दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ना. सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटल्यानेच चंद्रकांत पाटील हे घाबरून कोल्हापूर सोडून पुण्यात आल्याची टीका केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना हिंम्मत असेल तर पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल, असे आव्हान दिले होते.

यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची एकही जागा नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना सध्यातरी येथे कोणी आमदाराने राजीनामा देवून विधानसभा निवडणूक लढविण्यास संधी देण्याची शक्यता नाही. कोल्हापुरातून निवडणूक लढविण्याबाबत पाटील यांनी यापूर्वीच निर्णय घेणे अपेक्षित होते. आता कोल्हापुरातून निवडणूक लढविण्याबाबत ते विचार करत आहेत. त्यास पुण्यातील विशेत: कोथरुडमध्ये सुरू असलेल्या राजकारणाची किनार असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER