शरद पवारांबाबत अपशब्द उद्गारणा-या पडळकरांना भाजपने झापले; चंद्रकांत पाटलांचे मौन

पुणे : भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली त्यानंतर राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांनीही त्यांना झापले मात्र, पवारांच्या टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मौन बाळगले आहे.

ही बातमी पण वाचा :-पडळकरांचे विधान चुकीचे- फडणवीस

“मी या विषयावर बोलणार नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.

भाजपची भूमिका –

पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तर शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजप आपल्या नवनिर्वाचित आमदारावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER