चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांबाबतच्या त्या विधानाने वादळ; राष्ट्रवादीनेही पाटलांना फटकारले

Chandrakant Patil - Sharad Pawar

मुंबई :- केंद्रात मोदी शहा तर, राज्यात शरद पवार (Sharad Pawar) . या नावावर सतत टीका टिप्पणी होत असते. त्यातच भाजप नेत्यांकडून पवारांच्या नावावर अनेक वेळा टीका होताना दिसते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांबद्दल केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) ‘त्या’ विधानानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.

“राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. असे बोलताना पाटील यांनी पवार – फडणवीस यांची तुलना केलेलली दिसते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी कायम चांगले बोलत आलो आहे. मी आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला शरद पवारांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टरबुज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?,” असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट टीकास्त्र सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निशाणा साधला होता. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार दिल्लीचे नेते, त्यांच्यावर टीका करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER