तीन चाकी सरकारवर चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil

मुंबई :- महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. चंद्रकात पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मविआ सरकार आणि इतर मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. सरकार काही कामाचे नाही. या सरकारमधील मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रात विकास होईल अशी आशा भोळी बाभडी जनता करत आहे. परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात व कारनाम्यात आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याचे नाव पुढे आले आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली.” अशी माहिती माध्यमांतून येत आहे.

चंद्रकांत पाटील यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

“काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही.” असे ते म्हणाले.

चंद्रकांत दादांची नवाब मलिक, जितेंद्र आव्हाडांवर टीका

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ED ने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधातील एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते. असेही त्यांनी फेसबुकद्वारे स्पष्ट केले. ‘ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणारी म्हणवणा-या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे.’ असा आरोप त्यांनी केला.

“ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी काँगेस– काँग्रेस ने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.” अशी सुद्धा टीका पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER